२२ फेब्रुवारी महत्वाच्या घटना खालीलप्रमाणे
१८१९: स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.
१९४२: दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.
१९४८: झेकोस्लोव्हाकिया मध्ये कम्युनिस्ट क्रांती.
१९५८: इजिप्त आणि सीरिया या देशांनी एकत्र येऊन युनायटेड अरब प्रजासत्ताक तयार केले.
१९७८: श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९७९: सेंट लुशिया ला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.
२०११: न्यूझीलंड या देशातील दुसरा सर्वात भयंकर भूकंप क्राइस्टचर्चमध्ये झाला, या दुर्घटनेत किमान १८५ लोकांचे निधन.
१९७४: इस्लामिक सहकार्य संघटना – लाहोर, पाकिस्तान येथे झालेल्या शिखर परिषदेत, ३७ देश आणि २२ राष्ट्रप्रमुख आणि सरकार सहभागी होऊन, बांगलादेश देशाला मान्यता देतात.
१९५९: ली पेटी – अमेरिकन कार रेसर, यांनी पहिली डेटोना ५०० रेस जिकली.
१९४४: दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानांनी चुकून निजमेगेन, अर्न्हेम, एन्शेडे आणि डेव्हेंटर या डच शहरांवर बॉम्बफेक केली, परिणामी एकट्या निजमेगेन शहरात किमान ८०० लोकनाचे निधन.
१९४४: दुसरे महायुद्ध – सोव्हिएत रेड आर्मीने क्रिव्होई रोग प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला.
१८५६: युनायटेड स्टेट्स रिपब्लिकन पक्ष – पिट्सबर्ग येथे पहिले राष्ट्रीय अधिवेशन सुरू केले.
२२ फेब्रुवारी जन्म-दिनविशेष
१७३२: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १७९९)
१८३६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९०६)
१८५७: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्रिच हर्ट्झ यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १८९४)
१८५७: बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९४१)
१९०२: जर्मन भौतिकशात्रज्ञ फ्रिट्झ स्ट्रासमान यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९८०)
१९२०: चरित्र अभिनेता इफ्तिखार यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९९५)
१९२२: व्हायोलिनवादक व्ही. जी. जोग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)
१९६४: मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेमचे निर्माते एड बून यांचा जन्म.
१९७५: अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता ड्रिव बॅरीमोर यांचा जन्म
१९८३: भारतीय अभिनेते – तारका रत्न (मृत्यू : १८ फेब्रुवारी २०२३)
१९६४: अमेरिकन व्हिडिओ गेम प्रोग्रामर, मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेमचे निर्माते – एड बून
१९५२: तुवालु देशाचे ८वे पंतप्रधान – सौफातु सोपोआंगा (मृत्यू : १५ डिसेंबर २०२०)
१९४३: जर्मनी देशाचे ९वे अध्यक्ष – हॉर्स्ट कोहलर
१९४१: डॉमिनिकन रिपब्लिक देशाचे ५२वे अध्यक्ष – हिपोलिटो मेजिया
१९३६: अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि रोगप्रतिकारकशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक – जे. मायकेल बिशप
१९२८: अमेरिकन धार्मिक नेता, नेशन ऑफ गॉड्स अँड अर्थ्सचे संस्थापक – क्लेरेन्स 13X (मृत्यू : १३ जून १९६९)
१९२१: मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकचे २रे अध्यक्ष – जीन-बेडेल बोकासा (मृत्यू : ३ नोव्हेंबर १९९६)
१९१४: इटालियन-अमेरिकन विषाणूशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ – नोबेल पारितोषिक – रेनाटो दुल्बेको (मृत्यू : १९ फेब्रुवारी २०१२)
१९०८: व्हेनेझुएला देशाचे ५६वे राष्ट्राध्यक्ष – रोमुलो बेटान्कोर्ट (मृत्यू : २८ सप्टेंबर १९८१)
१८८९: बॅरोनेस बॅडेन-पॉवेल, इंग्लिश स्काउट लीडर, पहिल्या जागतिक मुख्य मार्गदर्शक – ओलाव्ह बॅडेन-पॉवेल (मृत्यू : २५ जून १९७७)
२२ फेब्रुवारी मृत्यू-दिनविशेष
१८१५: हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १७६१)
१८२७: चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील अमेरिकन यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १७४१)
१९२५: ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचे निधन. (जन्म: २० जुलै १८३६ – ड्युजबरी, यॉर्कशायर, इंग्लंड)

१९४४: कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८६९)
१९५८: स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)
१९८२: ऊर्दू कवी जोश मलिहाबादी यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १८९४)
२०००: लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)
२०००: प्रकाशक, श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९२३)
२००९: लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९४३)
२०१२: भारतीय लेखक आणि कवी – सुखबीर (जन्म: ९ जुलै १९२५)
२००२: अंगोला देशाचे राजकरणी आणि बंडखोर – जोनास साविम्बी (जन्म: ३ ऑगस्ट १९३४)