महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) कडून जवळपास २० हून अधिक पदांसाठी निवड प्रक्रिया राबवली जाते.
प्रश्न: निवड कोण करते ?
उत्तर: महाराष्ट्र राज्य.
प्रश्न: निवड कोणामार्फत केली जाते ?
उत्तर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (वैधानिक संस्था आहे. कलम ३१५ अन्वये)
प्रश्न: प्रक्रिया कशी पार पडते ?
उत्तर: विभागनिहाय रिक्त जागांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) पाठवली जातात . त्यावर राज्य सरकारची मंजूरी मिळवून पुढे परीक्षांचे आयोजन केले जाते .
प्रश्न: होणार्या निवड प्रक्रियेत आरक्षण कसे ?
उत्तर: मागणीपत्रला मंजूरी मिळाल्या नंतर आयोग गटनिहाय आरक्षणाचा विचार करून संपूर्ण जागांचे विभाजन करून जाहिरात प्रसिद्ध करतात .
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यासेवेमधून प्राप्त होणारी पदे खलील प्रमाणे…
राज्यासेवा गट- अ पदे
१)उपजिल्हाधिकारी
२)पोलीस उपअधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त
३)विक्रीकर सहायक आयुक्त
४)उपनिबंधक सहकारी संस्था
५)उपमुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी
६)गटविकास अधिकारी
७)सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा
८)मुख्याधिकारी, महानगरपालिका/नगर परिषद
९)राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक
१०)शिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा
११)तहसीलदार
१२)सहाय्यक संचालक, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता
राज्यासेवा गट- ब पदे
१)उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा
२)सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी
३)लेखा अधिकारी, महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा
४)मंत्रालयाचे विभाग अधिकारी
५)सहायक गटविकास अधिकारी
६)मुख्याधिकारी, महानगरपालिका/नगर परिषद
७)उपनिबंधक, को-ऑप. सोसायट्या
८)उपअधीक्षक, भूमी अभिलेख
९)उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
१०)सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क
११)नायब तहसीलदार
१२)कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी
१३)उद्योग अधिकारी, तांत्रिक
वरील सर्व पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दरवर्षी परीक्षा आयोजित केली जाते .परीक्षा पद्धत पारदर्शक असून सर्व नीतीमुल्यांचे तंतोतंत पालन करून परीक्षा केंद्रावर पार पडल्या जातात. परीक्षा केंद्रावर वाजवी खबरदारी व गोपनीयता पाळली जाते .