महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आज हिप बोनची सर्जरी करण्यात येणार आहे…. मुंबईतील नामांकित लीलावती रुग्णालयात ही सर्जरी होणार आहे. याआधी कोविडचा डेड सेल सापडल्यामुळं राज ठाकरे यांच्यावरची सर्जरी पुढे ढकलण्यात आली होती.
राज ठाकरे यांच्यावरची आजची शस्त्रक्रिया कोणतेही विघ्न न येता पार पडावी म्हणून मनसे पदाधिकाऱ्यांनी शिवाजी पार्कमधील गणपती मंदिरात यज्ञ तर दुसरीकडे मनसे चर्मकार सेनेतर्फे ट्रॉम्बे येथील हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आलीय आहे .