८ जानेवारी महत्वाच्या घटना.
१८३५: अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.
१८८०: सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.
१८८९: संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले.
१९४०: दुसरे महायुद्ध – ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.
१९४७: राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.
१९५७: गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली.
१९६३: लिओनार्डो डा व्हिन्सि यांच्या मोनालिसा चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.
२०००: लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
२००१: भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.
८ जानेवारी जन्म-दिनविशेष.
१९४५: प्रभा गणोरकर – मराठी लेखिका
१९४४: सुनील कांती रॉय – भारतीय उद्योजक – पद्मश्री (मृत्यू : ८ मे २०२२)
१९४२: स्टिफन हॉकिंग – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक
१९३९: नंदा – अभिनेत्री
१९३६: ज्योतिंद्रनाथ दिक्षीत – परराष्ट्रसचिव व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (मृत्यू : ३ जानेवारी २००५)
१९३५: एल्विस प्रेसली – अमेरिकन गिटारवादक, किंग ऑफ द रॉक अँड रोल (मृत्यू : १६ ऑगस्ट १९७७)
१९३१: तरुण मजुमदार – भारतीय चित्रपट दिग्दर्शक – पद्मश्री (मृत्यू : ४ जुलै २०२२)
१९२९: सईद जाफरी – अभिनेते
१९२६: केलुचरण महापात्रा – भारतीय ओडिसी नर्तक – पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (मृत्यू : ७ एप्रिल २००४)
१९२५: राकेश मोहन – हिंदी नाटककार (मृत्यू : ५ डिसेंबर १९७३)
१९२४: गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या (मृत्यू : ४ मार्च २०००)
१९०९: लेखिका आशापूर्णा देवी – ज्ञानपीठ पुरस्कार
१८८१: पाईपर एअरक्राफ्टचे संस्थापक, अमेरिकन अभियंते आणि उद्योगपती – विल्यम टी. पायपर (मृत्यू : १५ जानेवारी १९७०)