अजित दादा पवार : छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या मुद्यावर अजित पवार खास शैलीत एकदम स्पष्ट शब्दात बोलले.

ajit-pawar-13 MyCivilExam
कांदा उत्पादक शेतकऱ्याचे प्रश्न, छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा, सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? या सगळ्या प्रश्नांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.

कांदा उत्पादक शेतकऱ्याचे प्रश्न, छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा, सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? या सगळ्या प्रश्नांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.

“कांद्यामुळे आम्हाला फटका बसला.”

त्या संदर्भात पीयुष गोयल, अमित शाह या वरिष्ठांशी चर्चा केली. कांदा उत्पादक शेतकरी नाराज होता. त्याची किंमत आम्हाला मोजावी लागली. कांदा उत्पादकाला आणि ग्राहकाला दोघांना परवडलं पाहिजे, असं आमच मत होतं. आता ती मागणी गांभीर्याने घेतली आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि रावेरची जागा सोडली, तर अन्यत्र महायुतीला फटका बसला. नगर, नाशिक, सोलापूर आणि पुणे या पाच सहा जिल्ह्यात कांद्याच पीक घेतलं जात” आणि या पाच जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसला असं अजित पवार म्हणाले. “निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षाचे नेते आपली मत मांडत असतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत आणि भूमिका मांडण्याचा अधिकार आहे.त्यात कोणीही काही ही मते मधु शकतात त्या सर्व टिका टिप्पणीला उत्तर देन्यास मी बांधील नाही आणि त्या प्रत्येक टिका टिप्पणीला उत्तर देणार नाही” असं अजित पवार खास शैलीत बोलले.

अजित दादा बोलताना म्हणाले की “मला तुम्ही विकासाबद्दल विचारा. मी विकासामध्ये लक्ष घातलय. आपलं राज्य, जिल्ह्यातील महत्त्वाची काम कशी मार्गी लागतील हा प्रयत्न आहे. नव्या उमेदीने विधानसभेला महायुती पुन्हा सामोरी जाईल” असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.ह्या ‘पराभवावर मला चिंतनाची गरज नाही’ असही अजित पवार म्हणाले. राज्यसभेची उमेदवारी सुनेत्रा पवार यांना जाहीर झाल्याने छगन भुजबळ नाराज आहेत का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, “तुम्हाला काही महित नसतं.तुम्हाला तुमच्या हिशोबणे बातम्या पेरायच्या असतात आणि तो तुमचा अधिकार आहे. स्वत: छगन भुजबळ साहेब ही गोष्ट सांगताना बोलले की मी नाराज नाही. तरीही काही विरोधक, जवळचे मित्र अशा बातम्या पिकवत आहेत, त्यात तूसभरही तथ्य नाही. पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय झालाय”.

नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Table of Contents

Advertisement:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide