मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात काहीही होऊ शकते, असे वक्तव्य करून राजकीय तर्कवितर्कांना सुरूवात करून २४ तास उलटत नाही तोच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात काहीही होऊ शकते, असे वक्तव्य करून राजकीय तर्कवितर्कांना सुरूवात करून २४ तास उलटत नाही तोच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत शनिवारी नागपूर दौ-यावर असताना पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही नेहमी संस्कार आणि संस्कृती पाळली आहे. सरकार जे चांगले काम करते, विरोधी पक्षाने त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीमध्ये जे काम सुरू केले, त्याची आम्ही स्तुती केली.