राज ठाकरेंनी निवडणुकीच्या आधीच्या मुलाखतींमध्ये सरकार आमच्याच पाठिंब्यावर येणार, असा ठाम विश्वास व्यक्त करत होते. मात्र, विधानसभेचे निकाल मनसेसाठी निराशाजनक राहिले.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारत आपली सत्ता कायम राखली आहे. यामध्ये भाजपाने सर्वाधिक १३२, शिवसेना (एकनाथ शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादीने (अजित पवार) ४१ अशा एकूण २३० जागांवर विजय मिळवला. अशात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री योगेश कदम यांनी, विधानसभा निवडणुकीत मनसेने मते खाल्ल्यामुळे त्यांच्या पक्षाचे दहा उमेदवार पराभूत झाल्याचा दावा केला आहे. आता योगेश कदम यांच्या या दाव्यानंतर शिवसेना आणि मनसेमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.