राखेतून होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारावर वाल्मीक कराड या एकाच व्यक्तीचा प्रभाव असल्याचे आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केल्यानंतर यावर राज्यस्तरीय चर्चा सुरू झाली. पण त्यावर परळीकरांची प्रतिक्रिया एकच…‘श्शऽऽऽ… शांतता राखा!’
बीड : वैद्यनाथाची धार्मिक परळी पुढे गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने राजकीय पटावर चर्चेत आली. तिची औद्याोगिक ओळख औष्णिक वीज केंद्राची. या केंद्रातून निघणाऱ्या राखेभोवती परळीचे अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण तरंगते. राखेतून होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारावर वाल्मीक कराड या एकाच व्यक्तीचा प्रभाव असल्याचे आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केल्यानंतर यावर राज्यस्तरीय चर्चा सुरू झाली. पण त्यावर परळीकरांची प्रतिक्रिया एकच…‘श्शऽऽऽ… शांतता राखा!’