‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला निकषाची कात्री लागणार असल्याचं बोललं जात आहे.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. मात्र, यातही अद्याप काही महिलांना डिसेंबरचा हप्ता जमा झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, आता काही लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता निकष लावण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. एवढंच नाही तर ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर कारवाई सुरू झाली आहे.