दिलीपच्या सहकलाकारांनी त्याच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याला भेटण्याकरता ते हॉटेलमध्ये जात असतानाच त्याच्या मृत्यूची माहिती मिळाली.
मल्याळम अभिनेता दिलीप शंकर आज २९ डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरममधील एका हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनेबाबत गुन्हा दाखल केला असून चार दिवसांपूर्वी त्याने हॉटेलमध्ये चेक इन केले होते, असं अहवालात म्हटलं आहे.
हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की गेल्या दोन दिवसांपासून तो त्याच्या खोलीतून बाहेर आला नव्हता. त्याच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने आम्ही त्याची खोली उघडली. त्याची खोली उघडताच आम्हाला त्याचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांना तत्काळ कळवण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, खोलीची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम पाठवण्यात आली आहे.
दिलीपच्या सहकलाकारांनी त्याच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याला भेटण्याकरता ते हॉटेलमध्ये जात असतानाच त्याच्या मृत्यूची माहिती मिळाली.