“तो अजूनही तिथेच बसला आहे…” वाल्मिक कराडवरील मकोका आणि परळी बंदवर जितेंद्र आव्हाडांची मोठी प्रतिक्रिया
“तो अजूनही तिथेच बसला आहे…” वाल्मिक कराडवरील मकोका आणि परळी बंदवर जितेंद्र आव्हाडांची मोठी प्रतिक्रिया…बीड जिल्ह्यातील केज न्यायालयाने खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत मोठा निर्णय दिला आहे. वाल्मिक कराडवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर कराडची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणाबाबत वाल्मिक कराड याला आज (१४ जानेवारी) बीडच्या केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.