२५ फेब्रुवारी महत्वाच्या घटना दिनविशेष 

२५ फेब्रुवारी महत्वाच्या घटना दिनविशेष -mycivilexam.com
२५ फेब्रुवारी महत्वाच्या घटना

२५ फेब्रुवारी महत्वाच्या घटना

१५१०: पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.

१८१८: ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.

१९३५: फॉक्स मॉथ विमानाद्वारे मुंबई – नागपूर – जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.

१९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.

१९४५: दुसरे महायुद्ध – तुर्कस्तानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

१९६८: मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९८६: जनआंदोलनाच्या रेट्यामुळे २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.

१९९६: स्वर्गदारा तील तार्‍याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले.

१९४५: दुसरे महायुद्ध अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला


२५ फेब्रुवारी जन्म दिनविशेष 

१९४०: बालवाङ्‌मयकार विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९१४)

१८९४: आध्यात्मिक गुरू अवतार मेहेरबाबा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९६९ – मेहराझाद, पिंपळगाव, अहमदनगर, महाराष्ट्र)

१९३८: भारतीय क्रिकेट खेळाडू आणि पंच फारूक इंजिनिअर यांचा जन्म.

१९४३: बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक जॉर्ज हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: २९ नोव्हेंबर २००१)

१९४८: चित्रपट अभिनेते डॅनी डेंग्झोप्पा यांचा जन्म.

१९७४: हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९९३)

१७७८: पेरू देशाचे पहिले अध्यक्ष – जोस डे सान मार्टिन (मृत्यू : १७ ऑगस्ट १८५०)


२५ फेब्रुवारी मृत्यू दिनविशेष 

१५९९: संत एकनाथ यांचे निधन.

१९२४: जमखिंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले.

१९६४: चित्रपट अभिनेत्री शांता आपटे यांचे निधन.

१९७८: प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचे निधन. (जन्म: २९ जून १८९१)

१९८०: लेखिका व नाटककार गिरजाबाई महादेव केळकर यांचे निधन.

१९९९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सीबोर्ग यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १९१२)

२००१: ऑस्ट्रेलियन फलंदाज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)

२०१६: भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक भवरलाल जैन यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९३७)

२०२०: पाकिस्तानी वकील आणि राजकारणी – नईमतुल्ला खान (जन्म: १ ऑक्टोबर १९३०)


नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.