किल्ले सिंहगड घाट रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रविवार असल्याने गडावर पर्यटकांची खूप गर्दी झाली आहे. घाट रस्त्यावर वाहने पार्क केल्यामुळे किल्ले सिहगडावर ये जा करणारे पर्यटक अडकले आहेत.
चार तासांपासून वाहने एकाच जागेवर थांबली आहेत. त्यामुळे आठ ते दहा किलोमीटरच्या लागल्या रांगा लागल्या आहेत.या कोंडीचे कारण बेशिस्त पर्यटकांनी वाहने रस्त्यावरच पार्क केल्यामुळे मोठी अडचण निर्माण झालीय.