२२ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष .

२२ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष .-mycivilexam.com
२२ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष .

२२ जानेवारी महत्वाच्या घटना

१९०१: राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.

१९२४: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.

१९४७: भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली.

१९६३: डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले.

१९७१: सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

१९९९: ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.

२००१: आय. एन. एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात दाखल झाली.

२०१५: बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.


२२ जानेवारी जन्म-दिनविशेष.

१५६१: इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रँन्सिस बेकन यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १६२६)

१८९६: कवी सुर्यकांत त्रिपाठी उर्फ निशाला यांचा जन्म.

१८९९: हिंदुस्तानी संगीतज्ज्ञ दिलीप कुमार रॉय यांचा जन्म.

१९०१: भारतीय मानवशास्रज्ञ निर्मलकुमार बोस यांचा जन्म.

१९०९: संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस यू. थांट यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७४)

१९११: मराठी लेखक अनिरुद्ध घनश्याम रेळे यांचा जन्म.

१९१६: गुजराथी लेखक आणि कवी हरीलाल उपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी १९९४)

१९१६: बंगाली आणि हिंदी चित्रपट दिगदर्शक आणि पटकथा लेखक सत्येन बोस यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९९३)

१९२०: संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म.

१९२२: मराठी लेखिका शांता बुध्दिसागर यांचा जन्म.

१९३४: हिंदी चित्रपट निर्माते आणि दिगदर्शक विजय आनंद यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)

१९२०: संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म.

१९०८: अझरबैजानी-रशियन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार – लेव्ह लांडौ (मृत्यू : १ एप्रिल १९६८)


२२ जानेवारी मृत्यू-दिनविशेष.

१२९७: योगी चांगदेव यांनी समाधी घेतली.

१६६६: ५ वे मुघल सम्राट शहाजहान यांचे आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) कैदेत १० वर्षे राहिल्यानंतर निधन. (जन्म: ५ जानेवारी १५९२)

१६८२: समर्थ रामदास स्वामी यांचे निधन.

१७९९: ऑस्ट्रीयन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे यांचे निधन.

१९०१: ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य करणारी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचे निधन. (जन्म: २४ मे १८१९)

१९२२: शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते बायर फिद्रिक यांचे निधन.

१९६७: क्रांतिकारक, दिद्वान, कृषितज्ज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टीचे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८८४)

१९७२: राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९०३)

१९७३: अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)

१९७५: केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १८९४)

१९७८: इंग्लिश क्रिकेटपटू हर्बर्ट सटक्लिफ यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १८९४)

१९९९: ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स आणि त्याच्या दोन मुलांची ओदिशाच्या केओंझोर जिल्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.

२०१४: अक्किनेनी नागेश्वर राव – भारतीय अभिनेते आणि निर्माते – पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: २० सप्टेंबर १९२३)

१९८२: एडुआर्डो फ्री मॉन्टाल्वा – चिली देशाचे २८वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १६ जानेवारी १९११)

१९७१: अमेरिकन उद्योगपती आणि प्रकाशक, न्यूजडेचे सह-संस्थापक – हॅरी एफ. गुगेनहेम (जन्म: २३ ऑगस्ट १८९०)

१९००: मायक्रोफोनचे सहसंशोधक – डेव्हिड एडवर्ड ह्यूजेस (जन्म: १६ मे १८३१).


नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.