३ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

३ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष-mycivilexam.com
३ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

३ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

७८: शालिवाहन शकास प्रारंभ झाला.

१८४५: फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले.

१८६५: हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.

१८८५: अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.

१९२३: टाईम मॅगझिनचे पहिले मासिक प्रकाशित झाले.

१९३०: नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.

१९३८: सौदी अरेबिया मध्ये खनिज तेलाचा शोध लागला.

१९३९: महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकार च्या हुकूमशाही नियमा विरुद्ध मुंबईमध्ये येथे उपोषण सुरू केले.

१९४३: दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार.

१९६६: डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू झाले.

१९७३: भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू.

१९८६: ऑस्ट्रेलिया कायदा १९८६ प्रमाणे, ऑस्ट्रेलिया देश युनायटेड किंगडम पासुन पूर्णपणे स्वतंत्र झाला.

१९९४: जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.

२००३: महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या शरच्‍चंद्र चटोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.

२००५: स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

२०१५: २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

२०१७: निन्टेन्डो स्विच – जगभरात विक्रीसाठी सुरु झाले.

२००५: मार्गारेट विल्सन – यांची न्यूझीलंड हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षपदी निवड झाली. कोणत्याही देशाच्या सर्व सर्वोच्च राजकीय कार्यालयांमध्ये महिलांची नियुक्ती झाल्याची पहिली घटना.

१९६९: अपोलो प्रोग्राम – नासाने चंद्र मॉड्यूलची चाचणी घेण्यासाठी अपोलो ९ लाँच केले.

१९५८: नुरी अल-सैद – हे आठव्यांदा इराकचे पंतप्रधान बनले.

१९४५: दुसरे महायुद्ध – खराब हवामानामुळे कमी दिसत असल्यामुळे इंग्लंडच्या आरएएफ ने चुकून नेदरलँड्सच्या हेगमधील बेझुइडेनहाऊट भागात बॉम्बफेक केली या दुर्घटनेत किमान ५११ लोकांचे निधन.

१९३१: अमेरिका – देशाने स्टार-स्पॅंगल्ड बॅनरचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केले.

१९१८: ब्रेस्ट-लिटोव्हस्कचा करार – पहिल्या महायुद्धातून माघार घेण्यास मान्य करण्यासाठी रशियाने या करार स्वाक्षरी केली.

१८९१: शोशोन नॅशनल फॉरेस्ट, अमेरिका – जगातील पहिले राष्ट्रीय वनउद्यान सुरु झाले.

१५७५: तुकारोची लढाई – मुघल सम्राट अकबरने बंगालचा सुलतान दाऊद खान करानीच्या सैन्याचा पराभव केला.


३ मार्च जन्म दिनविशेष

१८३९: टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०४)

१८४५: जर्मन गणितज्ञ जॉर्ज कँटर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९१८)

१८४७: टेलिफोनचा जनक अॅलेक्झांडर ग्राहम बेल यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९२२)

१९२०: किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जन्म.

१९२३: इतिहासकार आणि ललित लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म.

१९२६: संगीतकार रवि शंकर शर्मा उर्फ रवि यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च २०१२)

१९२८: कवी आणि लेखक पुरुषोत्तम पाटील यांचा जन्म.

१९३९: भारतीय कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १९९९)

१९५५: विनोदी अभिनेता जसपाल भट्टी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २०१२)

१९६७: गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचा जन्म.

१९७०: पाकिस्तानी क्रिकेटपटू इंझमाम उल हक यांचा जन्म.

१९७७: भारताचा चौथा ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचा जन्म.

१९८७: श्रद्धा कपूर – भारतीय अभिनेत्री, गायिका आणि डिझायनर

१९७३: लक्झेंबर्ग देशाचे पंतप्रधान – झेवियर बेटेल

१९५२: भारतीय गायक-गीतकार – हांक सूफी (मृत्यू : ४ सप्टेंबर २०१२)

१९४८: अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, GIF इमेज फॉरमॅटचे निर्माते – स्टीव्ह विल्हाइट (मृत्यू : १४ मार्च २०२२)

१९४०: अमेरिकन फॅशन डिझायनर, पेरी एलिस कंपनीचे संस्थापक – पेरी एलिस (मृत्यू : ३० मे १९८६)

१९३५: बल्गेरिया देशाचे २रे अध्यक्ष – झेलु झेलेव (मृत्यू : ३० जानेवारी २०१५)

१९३०: आयन इलिस्कू – रोमानिया देशाचे अध्यक्ष

१९२४: टोमिची मुरायामा – जपान देशाचे ५२वे पंतप्रधान

२०२३: सदाशिव नथोबा आठवले – भारतीय इतिहासकार आणि ललित लेखक

१९१८: अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक – आर्थर कॉर्नबर्ग (मृत्यू : २६ ऑक्टोबर २००७)

१८९५: नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक – रॅगनार फ्रिश (मृत्यू : ३१ जानेवारी १९७३)

१८३१: अमेरिकन व्यापारी, पुलमन कंपनीचे संस्थापक – जॉर्ज पुलमन (मृत्यू : १९ ऑक्टोबर १८९७)

१८२५: जपानी सुमो पैलवान, ११वे योकोझुना – शिरानुई कोमोन शिरानुई कोमोन (मृत्यू : २४ फेब्रुवारी १८७९)


३ मार्च मृत्यू दिनविशेष

१७०३: इंग्लिश वैज्ञानिक रॉबर्ट हूक यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १६३५)

१७०७: सहावा मोघल सम्राट औरंगजेब यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८)

१९१९: कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८६४)

१९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकीचे २८वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन

१९६५: पार्श्वगायिका आणि अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकी यांचे निधन.

१९६७: माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे यांचे निधन.

१९८२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर रघुपती सहाय उर्फ फिरक गोरखपुरी यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १८९६)

१९९५: तबलावादक पं. निखील घोष यांचे निधन.

२०००: मराठी चित्रपट अभिनेत्री रंजना देशमुख यांचे निधन.

२०१७: हैती देशाचे ५२वे अध्यक्ष – रेने प्रिव्हल (जन्म: १७ जानेवारी १९४३)

२००२: भारतीय वकील आणि राजकारणी, लोकसभेचे १२वे अध्यक्ष – जी. एम. सी. बालयोगी (जन्म: १ ऑक्टोबर १९५१)

१९९९: जर्मन-कॅनेडियन रसायनशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक – गेरहार्ड हर्झबर्ग (जन्म: २५ डिसेंबर १९०४)

१९९३: पोलिश-अमेरिकन चिकित्सक आणि विषाणूशास्त्रज्ञ, पोलिओ लसचे संशोधक – अल्बर्ट सबिन (जन्म: २६ ऑगस्ट १९०६)

१९४८: भारतीय राजकीय नेते, हिंदू महासभेचे संस्थापक – डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे (जन्म: १२ डिसेंबर १८७२)

१९०१: अमेरिकन उद्योगपती, द ग्रेट अटलांटिक आणि पॅसिफिक टी कंपनीचे संस्थापक – जॉर्ज गिलमन

१७००: मराठा साम्राज्याचे ३रे छत्रपती – छत्रपती राजाराम महाराज (जन्म: २४ फेब्रुवारी १६७०)


नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.