‘ड्रेसकोड’ वादावरून विख्यात बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनची जागतिक स्पर्धेतून माघार! नक्की प्रकरण काय?
प्रवाहाच्या विरोधात जाण्याची आणि धाडसी निर्णय घेण्याची वृत्ती पाच वेळच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला इतर बुद्धिबळपटूंपेक्षा वेगळा बनवते. मात्र, त्याची हीच वृत्ती काही वेळा त्याचेच नुकसान करते. सध्या सुरू असलेल्या जागतिक जलद आणि अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत हेच पाहायला मिळाले. या स्पर्धेसाठी विशिष्ट ड्रेसकोड (पेहरावसंहिता) लागू करण्यात आला होता. मात्र, कार्लसनकडून त्याचे पालन करण्यात आले नाही. त्यानंतर स्पर्धेच्या आर्बिटरकडून (पंच) कार्लसनला पेहराव बदलून येण्याची सूचना करण्यात आली. मात्र, त्याने तसे न करता थेट स्पर्धेतून बाहेर पडणे पसंत केले.