शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्त्याला नरेंद्र मोदी यांनी मंजूरी निवडणुकीपूर्वी दिली होती . 2,000 रुपयांची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.शेतकरी सन्मान निधी ची रक्कम कशी आणि कधी येईल खात्यात जाणून घ्या.
माननीय श्री.पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांनी शपथविधी होताच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 2000 च्या 17 वा हप्त्याला मंजूरी दिली. हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होईल, असे सांगण्यात येत होते. आता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होईल, याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा 16 वा हप्ता या वर्षी निवडणुकीपूर्वी फेब्रुवारी महिन्यात जमा केला होता. त्यांनी एक बटण दाबून हा पैसा हस्तांतरीत केला होता.तेव्हा ते भारी येथे (यवतमाळ-नागपूर रस्त्यावरील) त्यांचा कार्यक्रम होता
शेतकरी सन्मान निधी 17 वा हप्ता कधी जमा होईल ?
शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता कधी जमा होणार याविषयीची शेतकर्यांमध्ये उत्सुकतेच वातावरण होते नरेंद्र मोदी यांनी घोषणा करून ही प्रतीक्षा संपवली . पेरणीच्या कालावधीत ही थोडीफार होणारी मदत शेतकऱ्यांना कामाला येणार आहे. त्यामुळे शेतकरी दोन हजार रुपयांची वाट बीजीएचटी आहेत. एका माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काशी दौर्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान 18 जून रोजी ते नरेंद्र मोदी ही हप्त्याची रक्कम वितरित करतील.