अहिल्यानगरचे लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके वादात भोवर्यात अडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.लंके यांनी सुरूवातीला आजीत दादा गटात जाऊन शरद पवारांशी बंड करत अजित दादांना सोबत किली होती परंतु खासदारकीच्या तिकीटावरून दादा आणि लंके याच्यात वाद होऊन लंके यांनी पुन्हा बारामतीची वाट पकडून शरद पवार गटाक्डून खासदारकी लढवत सुजय विखे यांचा पराभव करत खासदारकी मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील या खासदाराने गुंड गजा मारणे याची भेट घेतली आहे. त्यानंतर निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. यामुळे यावरुन आता राजकीय वाद रंगणार आहे. राजकाणातील गुन्हेगारीकरण यामुळे समोर आले आहे. या आधी अजित दादा यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनीही मारणे याची भेट घेतली होती तेव्हा ही राजकीय वर्तुलर मोठी खळबळ उडाली होती. दादांनी पार्थ पवार यांना चांगलेच दरडवले व पुन्हा असे होता कामा नये आसे संगितले.
नेमका हा गजानन मारणे उर्फ गाजा मारणे नेमका आहे तरी कोण?
गजानन मारणेचं मुळ गाव पुण्यातील मुळशी तालुक्यात आहे. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये व अश्या अनेक प्रकरणात गजा मारणे याला अटक झाली आहे. या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला शिक्षाही झाली होती. त्यानंतर गजा मारणे तीन वर्ष पुण्यातील येरवडा कारगृहात होता. तुरुंगातून सुटका झाल्या नंतर झालेल्या कार शो मुले तो प्र्कशझोतात आला होता. मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यात दबदबा आहे.
खासदार पदी लंके यांची वर्णी कशी लागली ?
अहिल्यानगरचे लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांना निलेश लंके यांनी पराभूत केले आहे . या निवडणुकीत खासदार निलेश लंके यांना 6 लाख 24 हजार 797 मते मिळाली. माजी खासदार सुजय विखे यांना 5 लाख 95 हजार 868 मते मिळाली होती. अवघड व रोमचीत करणारी चुरशीची लढत दोघ उमेदवारत झालेल्या या निवडणुकीत 28 हजार 929 मतांनी निलेश लंके यांचा विजय झाला. सुरूवातीला अजित दादा गट सोबत जाऊन लंके यांनी दादांना बंड करण्यास बळ दिले .नंतर खासदारकीच्या तिकीट वतपावरून दादा आणि लंके यात वाद झाले .लंके यांनी शरद पवार गट कडून विखे यांचा पराभव केला