प्रश्न: निवड कोण करते ?
उत्तर: महाराष्ट्र राज्य.
प्रश्न: निवड कोणामार्फत केली जाते ?
उत्तर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (वैधानिक संस्था आहे. कलम ३१५ अन्वये)
प्रश्न: प्रक्रिया कशी पार पडते ?
उत्तर: विभागनिहाय रिक्त जागांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) पाठवली जातात . त्यावर राज्य सरकारची मंजूरी मिळवून पुढे परीक्षांचे आयोजन केले जाते .
प्रश्न: होणार्या निवड प्रक्रियेत आरक्षण कसे ?
उत्तर: मागणीपत्रला मंजूरी मिळाल्या नंतर आयोग गटनिहाय आरक्षणाचा विचार करून संपूर्ण जागांचे विभाजन करून जाहिरात प्रसिद्ध करतात .
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग Combine (दुय्यम सेवा) परीक्षा मधून भरली जाणारी पदे खलील प्रमाणे,
१) STI(State Tax Inspector)-राज्य कर निरीक्षक
२) Police Sub Inspector-(PSI)-पोलीस उपनिरीक्षक
३) Assistant Section Officer-(ASO)-कक्ष अधिकारी
४) Sub Registrar -दुय्यम निबंधक