मुंबई केंद्रशासित प्रदेश घोषित करा, काँग्रेस आमदाराची मागणी, आदित्य ठाकरे भडकले, महाराष्ट्राचा…

मुंबई केंद्रशासित प्रदेश घोषित करा, काँग्रेस आमदाराची मागणी, आदित्य ठाकरे भडकले, महाराष्ट्राचा.../mycivilexam
मुंबई केंद्रशासित प्रदेश घोषित करा, काँग्रेस आमदाराची मागणी, आदित्य ठाकरे भडकले, महाराष्ट्राचा... कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी केली आहे.  मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या आमदाराला बरखास्त करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. दोन दिवसांपासून महाराष्ट्र एकीकरण समितीद्वारे बेळगावच्या सीमावर्ती भागाला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. तर कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी केली आहे.

कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी केली आहे.

नागपूर : मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या आमदाराला बरखास्त करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. दोन दिवसांपासून महाराष्ट्र एकीकरण समितीद्वारे बेळगावच्या सीमावर्ती भागाला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. तर कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी केली आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

या पार्श्वभूमीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले,‘काँग्रेस असो की भाजप कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी बेळगाव किंवा महाराष्ट्राचा अपमान केला असल्यास ते सहन केले जाणार नाही. मुंबईला केंद्रशासित करण्याचा विषय बोलणाऱ्या आमदाराला बरखास्त करायला हवे. मुंबई मिळवण्यासाठी मराठी माणसाने भरपूर संघर्ष केला आहे, तो विसरता येणार नाही.

गुलाबराव पाटलांची टीका

बेळगाव प्रश्नावर शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,‘बेळगाव व मुंबई याची तुलना करणे चुकीचे आहे. मुंबईने कधीच बेळगावप्रमाणे कुठल्याच भाषिकावर अन्याय केला नाही. मुंबई ही महाराष्ट्राची आहे व राहणार आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. बेळगाव केंद्रशासित झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे.’

कर्नाटक सरकारची दादागिरी सुरू : शंभुराज देसाई

मंत्री शंभूराज देसाई यांनी बेळगाव सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारवर कडाडून हल्ला चढवला. विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलाताना ते म्हणाले,‘कर्नाटक सरकारने सतत वादग्रस्त भागातील मराठी भाषिकांच्या अधिकारांना डावलले आहे. मागील सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी समन्वय मंत्र्यांची नियुक्ती केली होती. मात्र, कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला बेळगावला भेट देण्यास मज्जाव करून हे प्रयत्न हाणून पाडले. कर्नाटक सरकारची ही दादागिरी अनेक वर्षांपासून चालू आहे.’

नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:
Previous slide
Next slide
Previous slide
Next slide
संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.