चीनला देशाच्या पश्चिमेला लिथियमचा मोठा साठा सापडल्याने देशातील लिथियमच्या साठ्यात वाढ झाली आहे.
जगभरात लिथियमची मागणी वेगाने वाढत आहे. अशातच चीन आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लिथियम साठा असलेला देश ठरला आहे. चीनला देशाच्या पश्चिमेला लिथियमचा मोठा साठा सापडल्याने देशातील लिथियमच्या साठ्यात वाढ झाली आहे. चिलीकडे आजही जगातील सर्वाधिक लिथियमचा साठा आहे. मात्र, चीनने लिथियमचा सर्वाधिक साठा असणाऱ्या ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना व बोलिव्हिया या देशांना मागे टाकले आहे. आजच्या काळात लिथियम हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे; ज्याचा वापर इलेक्ट्रिक वाहनांपासून सेलफोन संप्रेषण व आण्विक इंधनापर्यंतच्या अनेक उद्योगांमध्ये केला जातो. परंतु, चीनच्या लिथियम साठ्यात वाढ होणे, ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे. त्याचे कारण काय? चीनकडे किती लिथियम साठा आहे? त्याचा धोका काय? त्याविषयी जाणून घेऊ.