ठाकरे गटाच्या या भूमिकेमुळे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पुढील भूमिका काय? यावर भाष्य करत आहेत.
महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर महाविकास आघाडी आता तुटणार असल्याची चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर आरोप करत टीका करत आहेत. असं असतानाच आज (११ जानेवारी) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
तसेच ठाकरे गटाच्या या भूमिकेमुळे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पुढील भूमिका काय? यावर भाष्य करत आहेत. आता यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया देत आपलं रोखठोक मत मांडलं आहे. “महापालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे त्यांना न्याय मिळायलाच हवा”, अशी सूचक प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.