सौरभ राजपूत यांच्या हत्या प्रकरणाचा आता शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या शवविच्छेदन अहवालामधून आता धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मर्चंट नेव्हीमधील एका अधिकाऱ्याची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना घडली. सौरभ राजपूत असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाने मिळून ही हत्या केली. तसेच मृतदेहाचे १५ तुकडे करत एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून सिमेंट काँक्रिटसह पुरले. या प्रकरणात आता दररोज वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना अटक केलं असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची आता कसून चौकशी सुरु आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या का केली? ही हत्या कशी केली? हत्या करताना कशाचा वापर केला? यात आणखी कोणाचा सहभाग आहे क? असा सर्व बाजूंनी पोलीस तपास करत आहेत. सौरभ राजपूत यांच्या हत्या प्रकरणाचा आता शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या शवविच्छेदन अहवालामधून आता धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.
शवविच्छेदन अहवाल
शवविच्छेदन अहवालात असं दिसून आलं आहे की, सौरभ राजपूतची हत्या दोन आठवड्यांपूर्वीच करण्यात आली होती. तसेच त्याची त्वचा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अशी माहिती शवविच्छेदन अहवालामधून समोर आली आहे. या संदर्भात मेरठचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ.अशोक कटारिया यांनी माहिती देताना सांगितलं की, “शवविच्छेदन अहवालातून असं दिसून आलं की, सौरभची हत्या दोन आठवड्यांपूर्वी झाली होती. तसेच त्याची त्वचा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्वचेला गंभीर नुकसान करण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच मृतदेहाचे अनेक भाग कापलेले होते. त्याचे दात देखील हालत होते आणि त्याची त्वचा खूप सैल झाली होती”, अशी माहिती त्यांनी दिलं.
दरम्यान, मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तुरुंग प्रशासनाचे वरिष्ठ अधीक्षक वीरेश राज शर्मा यांनी मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्लाबाबत माहिती देताना सांगितलं की, “मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना बुधवारी संध्याकाळी ६ वाजता तुरुंगात आणण्यात आलं. मुस्कानला महिलांच्या बराकमध्ये ठेवण्यात आलं आहे, तर साहिलला पुरुषांच्या बराकमध्ये ठेवण्यात आलं आहे. मुस्कान गप्प राहिली, तिने कोणाशीही संवाद साधला नाही. तसेच तिने दिलेले अन्नही खाल्ले नाही”, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
प्रियकरामुळे मुस्कानला अंमली पदार्थाचे व्यसन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कानचा प्रियकर साहिल शुक्ला अंमली पदार्थांचे व्यसन करत होता. त्याने मुस्कानलाही या व्यसनाची सवय लावली होती. दोघेही भेटल्यानंतर अंमली पदार्थाचे सेवन करत असत. या व्यसनामुळेच तिला साहिलला सोडायचे नव्हते. सौरभ राजपूत याला विरोध करेल, या भीतीपोटी दोघांनी त्याला संपविण्याचा कट रचला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
9 Responses
Thank you for the auspicious writeup. It in fact was a amusement account it.
Look advanced to more added agreeable from you! However,
how could we communicate?
Wow that was unusual. I just wrote an incredibly long comment but after I clicked submit my comment didn’t show up.
Grrrr… well I’m not writing all that over again.
Anyways, just wanted to say excellent blog!
I have been surfing online more than 3 hours lately,
but I never discovered any fascinating article like yours.
It’s pretty value enough for me. In my view, if all webmasters and bloggers made excellent content as you probably
did, the net can be a lot more helpful than ever before.
I like what you guys tend to be up too. This type
of clever work and exposure! Keep up the fantastic works guys I’ve incorporated you guys to my blogroll.
Heya are using WordPress for your site platform?
I’m new to the blog world but I’m trying to get started and set up my own. Do you require any html coding expertise to make your own blog?
Any help would be really appreciated!
Whats up are using WordPress for your blog platform? I’m new to
the blog world but I’m trying to get started and set up my own. Do you require any html coding knowledge to make your own blog?
Any help would be really appreciated!
I’m really loving the theme/design of your website. Do you ever run into any internet browser compatibility
problems? A handful of my blog visitors have complained about my website not working correctly in Explorer but looks great in Safari.
Do you have any tips to help fix this issue?
Hi there, I check your blog like every week.
Your humoristic style is witty, keep up the good work!
What’s up i am kavin, its my first occasion to commenting anywhere, when i read this post i thought i
could also create comment due to this sensible article.