अजित पवार मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेट देण्यास आले होते तेव्हाही ही गाडी अजित पवारांच्या ताफ्यात होती, असा विरोधकांचा दावा आहे. मात्र, या गाडीच्या मालकाने अनेक आरोप फेटाळून लावले आहेत.
बीडमधील पवनचक्की उद्योजकाकडे खंडणी मागितल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेले वाल्मिक कराड शरण येताना अजित पवारांच्या ताफ्यातील एका गाडीतून आल्यचा आरोप केला जात आहे. अजित पवार मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेट देण्यास आले होते तेव्हाही ही गाडी अजित पवारांच्या ताफ्यात होती, असा विरोधकांचा दावा आहे. मात्र, या गाडीच्या मालकाने अनेक आरोप फेटाळून लावले आहेत. या गाडीचे माल शिवलिंग मोराळे यांनी टीव्ही ९ शी संवाद साधताना अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.