बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून पाहणी.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महापौर बंगला या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचं कामही सुरु झालं आहे तसंच गेल्या काही वर्षांपासून याबाबत चर्चाही सुरु आहे. आर्टिटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट यांचे धन्यवाद देतो. कारण हे काम आत्ता छान वाटतं आहे पण ते करणं जिकिरीचं होतं. एक महत्त्वाचा योगायोग म्हणजे या स्मारकाच्या शेजारीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचंही स्मारक आहे. महापौर बंगला या वास्तूशी आम्ही भावनिकरित्या जोडलो गेलो आहोत” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.