पोलीसांच्या तात्काळ मदत केंद्राच्या फोनवर संपर्क साधून नियंत्रण कक्षात बॉम्ब ठेवल्याचा खोटा संदेश देण्याचा प्रकार शनिवारी समोर आला.
सांगली : पोलीसांच्या तात्काळ मदत केंद्राच्या फोनवर संपर्क साधून नियंत्रण कक्षात बॉम्ब ठेवल्याचा खोटा संदेश देण्याचा प्रकार शनिवारी समोर आला. या प्रकरणी काही तासातच खोटा कॉल करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्यांने मद्याच्या नशेत हा संदेश दिल्याची कबुली दिली. यामुळे पोलीसांची मात्र धावपळ उडाली.
(पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी आज सकाळी ११.३० वाजता अज्ञाताने सांगली कंट्रोल रुमला बॉम्ब असल्याचा फोन केला.)