दुसरीकडे चीनमध्ये एचव्हीएमपी विषाणूचा उद्रेक सुरू असून, या विषाणूचे काही रुग्ण भारतातही सापडले आहेत. आज राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत बैठक बोलावली आहे.
राज्यात गेल्या महिन्याभरापासून बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गाजत आहे. या हत्येतील सहा आरोपींपैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. दरम्यान या प्रकणातील आरोपींचा वाल्मिक कराड यांच्याशी संबंध असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान वाल्मिक कराड कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने विरोधक मुंडे यांच्या राजीनाम्याची आक्रमकपणे मागणी करत आहेत.
दुसरीकडे चीनमध्ये एचएमपीव्ही विषाणूचा उद्रेक सुरू असून, या विषाणूचे काही रुग्ण भारतातही सापडले आहेत. आज राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत बैठक बोलावली आहे. त्याचबरोबर नागपूरातही या विषाणूचे दोन संशयीत रुग्ण आढळले आहेत. हे दोन रुग्ण ७ आणि १४ वयाची आहेत. भारतातील एकूण प्रकरणे आता ७ पर्यंत वाढली आहेत.