कार्षापण किंवा आहत नाणी कशापासून तयार करण्यात येत होती? नाण्यांवरील कोणते पुराभिलेख आणि प्रतिमा आपल्याला शासक आणि त्यांच्या राजवटींबद्दल माहिती सांगतात?
स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखांची मालिका सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान असे अनेक विषय आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. या लेखात, पौराणिक कथा आणि संस्कृती या विषयात पारंगत असलेले प्रख्यात लेखक देवदत्त पट्टनायक यांनीभारतातील नाण्यांचा इतिहास मांडला आहे. मानवी संस्कृती अस्तित्त्वात आल्यापासून मानवी समाजातील देवाणघेवाण सुलभ व्हावी यासाठी मानवाने व्यापार करण्यास सुरुवात केली. हा व्यापार करताना सुरुवातीच्या कालखंडात कोणत्याही चलनाशिवाय कर्जाची नोंद केली गेली. कर्ज- ऋण या शब्दाचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदातही सापडतो. किंबहुना याच संकल्पनांनी नाणी चलनात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.