चीनमध्ये सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक सुरू आहे.
चीनमध्ये सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात देखील खबरदारी घेतली जात आहे. यादरम्यान इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नेटवर्क लॅबोरेटरीजच्या नियमीत तपासणीदरम्यान किमान दोन एचएमपीव्हीचे रूग्ण आढळून आले आहेत. या दरम्यान या संसर्गासंबंधी केंद्र सरकारने काही महत्त्वाची माहिती दिली आहे.