शरद पवार यांच्या बाजूला अजित पवार यांची असन व्यवस्था करण्यात आली होती. हे पहिल्यानंतर अजित पवारांनी संबधित अधिकार्यांना नावाची प्लेट बदलण्यास सांगितली.
पुणे : पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार राजेश टोपे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर अजित पवार हे व्यासपीठावर आले. त्यावेळी शरद पवार यांच्या बाजूला अजित पवार यांची असन व्यवस्था करण्यात आली होती. ही असन पहिल्यानंतर अजित पवारांनी संबधित अधिकार्यांना नावाची प्लेट बदलण्यास सांगितली आणि शरद पवार यांच्या बाजूला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाची प्लेट ठेवण्यास सांगितली. या कृतीमधून अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या बाजूला बसण्याचे टाळल्याचे दिसून आले.
तसेच या कार्यक्रमा दरम्यान अहिल्यानगर येथील ‘अंबालिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड’ सर्वोत्कृष्ट साखर कारखाना ठरला असून, विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याला देण्यात येणार आहे.