२१ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष
१५५६: ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणार्या आर्चबिशप थॉमस क्रॅनमर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.
१६८०: शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली.
१८५८: इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ यांनी झाशीस वेढा दिला.
१८७१: ऑटो व्हॉन बिस्मार्क हे जर्मनीचा चॅन्सेलर बनला.
१९३५: शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.
१९७७: भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
१९८०: अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.
१९९०: नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
२०००: फ्रेंच गयानातील कोअरु येथून एरियन ५०५ या वाहकाद्वारे भारताचा इन्सॅट ३ बी हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.
२००३: जळगाव महानगरपालीकेची स्थापना.
२००६: सोशल मीडिया साइट ट्विटर ची स्थापना झाली.
२०१२: आंतरराष्ट्रीय वन दिन
२१ मार्च जन्म दिनविशेष
१७६८: फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १८३०)
१८४७: कालजंत्रीकार बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९०६)
१८८७: देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १९५४)
१९१६: भारतरत्न शहनाईवादक बिस्मिल्ला खान यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट २००६)
१९२३: सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २०११)
१९७८: अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा जन्म.
१९४८: संगणक शास्त्रज्ञ, 🙂 आणि 🙁 या पहिल्या इमोटीकॉन्सचे निर्माते स्कॉट फॅहलमन यांचा जन्म
१९२८: नेपाळ देशाचे २४वे पंतप्रधान सूर्य बहादूर थापा यांचा जन्म (मृत्यू : १५ एप्रिल २०१५)
१९०४: एम अँड एमचे (M&M) संस्थापक फॉरेस्ट मार्स सीनियर यांचा जन्म (मृत्यू : १ जुलै १९९९)
२१ मार्च मृत्यू दिनविशेष
१९७३: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १८९१)
१९७३: आतुन कीर्तन वरुन तमाशा या नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
१९८५: ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह यांचे निधन. (जन्म: २० मार्च १९०८)
२००१: दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाई चे स्थापक चुंग जू-युंग यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९१५)
२००३: भारतीय लेखक शिवानी यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १९२३)
२००५: चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक दिनकर द. पाटील यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १९१५)
२०१०: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९२६)
२०१२: स्विस आर्किटेक्टने हॅलेनस्टॅडियनचे रचनाकार ब्रुनो जियाकोमेटी यांचे निधन (जन्म: २४ ऑगस्ट १९०७)
१९९१: अमेरिकन उद्योगपती, फेंडर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स कॉर्पोरेशन कंपनीचे संस्थापक लिओ फेंडर यांचे निधन (जन्म: १० ऑगस्ट १९०९)
१८४३: मेक्सिको देशाचे पहिले राष्ट्रपती ग्वाडालुपे व्हिक्टोरिया यांचे निधन (जन्म: २९ सप्टेंबर १७८६)
२३५: रोमन सम्राट अलेक्झांडर सेव्हरस (जन्म: १ ऑक्टोबर २०८)