५ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष.

५ जानेवारी महत्वाच्या घटना./mycivilexam.com
५ जानेवारी महत्वाच्या घटना.

१६६४: छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला.

१६७१: छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून साल्हेर काबीज केले.

१८३२: दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.

१९९९: द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.

१९२४: महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केले.

१९३३: सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.

१९४८: वॉर्नर ब्रदर्स यांनी रोझ बाऊल फुटबॉल स्पर्धेच्या जगातील पहिल्या रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले.

१९४९: पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.

१९५७: विक्रीकर कायदा सुरू झाला.

१९७४: अंटार्क्टिकामधील सर्वोच्‍च तापमानाची (१५º सेल्सिअस) नोंद झाली.

१९९७: रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.

१९९८: ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

२००४: संभाजी ब्रिगेड या जातीयवादी संघटनेच्या गुंड समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.

२०२२: काजकस्तान – देशातील अशांततेला थांबवण्यासाठी देशव्यापी आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली.

१९१९: द जर्मन वर्कर्स पार्टी – सुरवात, याच पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.


५ जानेवारी जन्म-दिनविशेष.

१५९२: ५वा मुघल सम्राट शहाजहान यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १६६६)

१८५५: अमेरिकन संशोधक व उद्योजक किंग कँप जिलेट यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै १९३२)

१८६८: मराठी संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू यांचा जन्म.

१८६९: कन्नड साहित्यिक व्यंकटेश तिरको कुलकर्णी यांचा जन्म.

१८९२: लेखक व मराठी भाषातज्ञ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून १९६४ – मुंबई)

१९१३: मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च २००७)

१९२२: आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते मोहम्मद उमर मुक्री यांचा जन्म. (मृत्यू: ४ सप्टेंबर २०००)

१९२५: मराठी साहित्यिक रमेश मंत्री यांचा जन्म.

१९२८: मराठी साहित्यिक विजय तेंडूलकर यांचा जन्म.

१९४१: भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९वे व शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर २०११)

१९४८: भारतीय क्रिकेटपटू पार्थसारथी शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर २०१०)

१९४८: अभिनेत्री आणि गायिका फय्याज यांचा जन्म.

१९५५: पश्चिम बंगालच्या ८ व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा जन्म.

१९८६: हिंदी चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा जन्म.

१९६८: सतीशन पचेनी – भारतीय राजकारणी (मृत्यू : २७ ऑक्टोबर २०२२)

१९२८: झुल्फिकार अली भुट्टो – पाकिस्तान देशाचे ४थे राष्ट्रपती, वकील आणि राजकारणी (मृत्यू : ४ एप्रिल १९७९)

१९०३: ऑस्ट्रेलियन नेव्हिगेटर आणि विली पोस्ट यांच्यासोबत सिंगल-इंजिन मोनोप्लेन विमानातून संपूर्ण जगाची परिक्रमा करणारे पहिले व्यक्ती – हॅरोल्ड गॅटी (मृत्यू: ३० ऑगस्ट १९५७)

१८८३: हंगेरी देशाचे ३५वे पंतप्रधान, हंगेरियन जनरल आणि राजकारणी – डोम सझतोजय (मृत्यू : २२ ऑगस्ट १९४६)

१८२३: मेक्सिको देशाचे अंतरिम अध्यक्ष – जोसे मारिया इग्लेसियस (मृत्यू: १७ डिसेंबर १८९१)


५ जानेवारी मृत्यू-दिनविशेष.

१८४७: कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ आणि गायक त्यागराज यांचे निधन.

१९३३: अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष काल्व्हिन कूलिज यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १८७२)

१९४३: अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १८६४)

१९७१: भारतीय जादुगार पी. सी. सरकार यांचे निधन.

१९८२: भारतीय संगीतकार रामचंद्र चितळकर उर्फ सी. रामचंद्र यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९१८)

१९९०: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक रमेश बहल यांचे निधन.

१९९२: इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९१४)

२००३: पखवाजवादक गोपालदास पानसे यांचे निधन.

२०१८: असगर खान – पाकिस्तानी जनरल आणि राजकारणी (जन्म: १७ जानेवारी १९२१)

२०१३: अन्वर शमीम – पाकिस्तानी जनरल (जन्म: १ ऑक्टोबर १९३१)

१९९१: टोनिस किंट – एस्टोनिया देशाचे राष्ट्रपतींच्या कर्तव्यात पंतप्रधान, लेफ्टनंट आणि राजकारणी (जन्म: १७ ऑगस्ट १८९६)

१९६१: नारायण ताम्हनकर – बालसाहित्यिक (जन्म: ३० ऑगस्ट १८१३)

१९५२: नवाब इफ्तिखार अली खान पतौडी – ८वे पतौडी (जन्म: १६ मार्च १९१०)

१९३९: अमेलिया इअरहार्ट – अटलांटिक महासागर एकट्याने पार करणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक (जन्म: २४ जुलै १८९७)

नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.