ह्या लोकसभा निवडणुकीत झालेली चूक पुढे विधानसभा निवडणुकीला करू नका, असे अजित दादा पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले ,तश्या स्पष्ट सूचनाही केल्या वेळोवेळी विकासनिधी देऊनही तालुक्यातून मताधिक्य कमी झाले ? असा सवाल विधानसभा निवडणुकीसंदर्भात आदेश देताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर उपस्थित केला आहे.
पुणे जिल्ह्यातील १३ विधानसभा मतदारसंघात तयारी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे सध्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रमुख,तालुका प्रमुख, शाखाअध्यक्ष,कार्यकर्त्यांना, दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेली चूक विधानसभा निवडणुकित होऊ नये अश्या सूचनाही या वेळी अजित पवार यांनी केल्या. असे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितेल आहे. तर वेळोवेळी भरगोस विकासनिधी देऊनही तालुक्यातून मताधिक्य कमी कस? असा सवाल करत आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी हा संतप्त सवाल तीव्र पणे कार्यकर्त्यांसमोर उपस्थित केला आहे. तर आतापासूनच तयारीला लागून झालेल्या चुका सुधारून १३ विधानसभेत तयारी करा , अशी चेतावणी अजित पवार यांनी पराभवानंतर कार्यकर्त्यांनी दिली आहे.